‘ तुमचा चित्रपट ओटीटीवर रिलीज करून देतो ‘ , नगरच्या निर्मात्याला जाळ्यात ओढलं अन..

शेअर करा

तुमचा चित्रपट ओटीटीवर रिलीज करून देतो असे आमिष दाखवत नगरमधील एका निर्मात्याची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून पुण्यातील बाणेर इथे ही घटना घडलेली आहे. चार जणांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , बलभीम सखाराम पठारे ( राहणार सोना नगर चौक सावेडी अहमदनगर ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून हिंजवडी पोलीस ठाण्यात त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे .

व्ही मास एशिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक साकेत सावंत ( राहणार बदलापूर ),  संचालिका काजल कोरे , अनसिक पगारे आणि अर्चना वाघेरे अशी गुन्हा झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. बलभीम पठारे हे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते असून आरोपींनी त्यांना ओटीपी प्लॅटफॉर्मवर तुमचा चित्रपट रिलीज करून देतो असे आमिष दाखवत जाळ्यात ओढले आणि त्यानंतर त्यांची फसवणूक केली.


शेअर करा