वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर हिच्या आई मनोरमा खेडकर यांनी मुळशीतील एका शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवला होता याप्रकरणी त्यांची आई मनोरमा खेडकर यांच्या जामिनावर सरकारी पक्ष , मूळ फिर्यादी आणि बचाव पक्ष यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला असून आज दोन तारखेला या संदर्भात निर्णय येणार आहे.
मनोरमा खेडकर यांचे वकील सुधीर शहा यांनी मनोरमा खेडकर यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना आहे त्यामुळे त्यांना आर्म ऍक्ट लागू होत नाही. त्यांनी स्वसंरक्षणासाठी पिस्तूल वापरलेले आहे असा युक्तिवाद केलेला आहे. सरकारी पक्षाकडून एडवोकेट कुंडलिक चौरे आणि मूळ फिर्यादी यांच्याकडून अमेय बाळकवडे यांनी युक्तिवाद केलेला असून आज या प्रकरणी निर्णय येण्याची शक्यता आहे.