हुंडाई कंपनीची तुम्हाला डीलरशिप मिळून देतो , तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल

शेअर करा

नगरमध्ये फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून हुंडाई कंपनीची तुम्हाला डीलरशिप मिळून देतो असे आमिष दाखवत  एका व्यक्तीला जाळ्यात ओढण्यात आले आणि त्यानंतर त्यांची तब्बल दोन लाख 95 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. 

उपलब्ध माहितीनुसार , संजय दशरथ वाघ (वय पन्नास वर्ष राहणार कॉटेज कॉर्नर सावेडी ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून त्यांना एका मोबाईल नंबरवर फोन आलेला होता त्यावेळी समोरील व्यक्तीने तुम्हाला हुंडाई कंपनीचे डीलरशिप मिळून देतो असे आमिष दाखवले होते . 

फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे कथित नाव विष्णू जैन असे असून त्याच्या मोबाईल नंबरच्या आधारे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी यांचे चार चाकी गाडीचे वर्कशॉप असून अनोळखी नंबरवर फोन आला आणि फिर्यादी यांनी बोलण्यास सुरू केले त्यावेळी त्यानंतर समोरील व्यक्तीने फिर्यादी यांना आपल्या जाळ्यात ओढले आणि हुंडाई कंपनीच्या नावाने बनावट ई-मेल पाठवून त्यांचा विश्वास देखील संपादन केला

डीलरशिप नगरमध्ये तुम्हालाच मिळून देणार आहे असे आश्वासन दाखवत त्याने याच्यासाठी असलेली प्रोसेसिंग फी म्हणून दोन लाख 95 हजार रुपये पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात जमा करण्यास सांगितले होते. हुंडाई कंपनीची डीलरशिप मिळेल या आशेला फिर्यादी भुलले आणि त्यांनी ही रक्कम जमा केली मात्र कुठलीही डीलरशिप मिळाली नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिसात धाव घेतली आहे.


शेअर करा