सासरच्या लोकांनी भोंदूबाबाकडं नेलं , मौलानाचा विवाहितेवर अत्याचार

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका सुनेला दवाखान्यात नेण्याऐवजी सासरचे लोक भोंदूगिरी करणाऱ्या बाबाकडे घेऊन गेले आणि त्यानंतर या नराधमाने या महिलेचे लैंगिक शोषण करत तिच्यावर अत्याचार केला. 

उपलब्ध माहितीनुसार , अमीन हुसेन यासीन शेख ( वय 32 वर्ष ) असे आरोपी मौलाना बाबाचे नाव असून पीडित महिलेला भूतबाधा झाल्याचा कुटुंबियांचा दावा होता. नाशिक येथील हे प्रकरण असून आरोपीने तिला चार दिवस इलाज करावा लागेल असे सांगितले आणि त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

पीडित महिलेने त्यानंतर हा प्रकार कुटुंबियांना सांगितला आणि आरोपी अमीन याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे. 


शेअर करा