दिनेश आहेर यांच्या पथकाने ‘ त्या ‘ चार जणांना केलं जेरबंद 

शेअर करा

नगरमध्ये एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून सरपंचावरील अविश्वास ठराव होऊ नये यासाठी एका सदस्याचे फिल्मी स्टाईल अपहरण करण्यात आलेले होते. अपहरणकर्त्या चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेली असून याप्रकरणी मुख्य सूत्रधार मात्र अद्याप फरार आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , किशोर सोमनाथ सांगळे ( वय 27 राहणार सिद्धटेक तालुका कर्जत ) सागर चिमाजी देमुंडे ( वय सत्तावीस तालुका कर्जत ) , प्रतीक पवार ( वय 25 राहणार कर्जत ),  महेंद्र अरुण गोडसे ( वय 26 राहणार कर्जत ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून घटनेमागचा मुख्य सूत्रधार माऊली ज्ञानेश्वर उबाळे ( राहणार आढळगाव ) आणि अमोल भोसले हे मात्र अद्यापपर्यंत फरार आहेत . 

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील सरपंच असलेल्या व्यक्तीवर अविश्वास ठराव आणण्यात आलेला होता आणि हा ठराव दहा जुलै रोजी सादर होणार होता मात्र त्याच्या आधीच सरपंच शिवप्रसाद उबाळे आणि त्यांच्या साथीदारांनी ग्रामपंचायतचे सदस्य दीपक राऊत यांचे अपहरण केले आणि त्यानंतर मिरजगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. 

सदर गुन्ह्याचा अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत असताना आरोपी किशोर सांगळे हा सिद्धटेक इथे असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर तात्काळ कारवाई करत त्याला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे इतरही तीन जणांना जेरबंद करण्यात आलेले असून मुख्य सूत्रधाराचा मात्र तपास सुरू असल्याची माहिती आहे. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे. 


शेअर करा