नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथे तब्बल 40 दिवस उलटून देखील बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी सापडत नसल्याने हतबल झालेल्या आई-वडिलांनी अखेर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या आवारातच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळलेला आहे/
श्रीरामपूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी जून महिन्यापासून बेपत्ता झालेली असून जून जुलै आणि ऑगस्ट महिना आला तरीदेखील ही मुलगी पोलिसांना सापडली नाही. पोलिसांनी कारवाई करत मुलीसोबत असलेला आरोपी सागर आव्हाड याला मदत करणारा सचिन आव्हाड याला अटकही केली त्यानंतर पोलीस पुणे जिल्ह्यात जाऊन आले मात्र अल्पवयीन मुलगी मिळून आली नाही.
दोन महिने उलटून देखील आपली मुलगी शोधण्यात पोलिसांना अपयश येत आहे हे लक्षात आल्यानंतर हतबल झालेल्या आई-वडिलांनी दोन तारखेला सकाळी तालुका पोलीस स्टेशन गाठले आणि त्यानंतर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपाधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे यांनी त्यानंतर या कुटुंबीयांचे समुपदेशन केलेले असून विशेष पथक नेमून शोध घेऊ असे आश्वासन दिलेले आहे.