अहमदनगर महापालिकेच्या वीजबिलाची 72% बचत अंधार करून तर नाही ? 

शेअर करा

अहमदनगर महापालिकेने जुने दिवे काढून एलईडी दिवे लावल्यानंतर महापालिकेच्या वीजबिलात 72% ची बचत झालेली आहे मात्र दुसरीकडे अनेक मुख्य रस्त्यांवर रात्रीच्या वेळी अंधार दिसून येत असल्याने नक्की एलईडी दिवे लावून बचत झाली की पथदिव्यांचा पुरवठा बंद करून बचत झाल्याचा दावा केला जातोय ? असाही एक प्रश्न उपस्थित होत आहे. 

महापालिकेने खाजगी ठेकेदारांकडून 32 हजार 450 स्मार्ट एलईडी शहरात लावल्याचा दावा केलेला आहे. जुने दिवे काढून नवीन दिवे लावले मात्र त्यानंतर देखील शहरातील अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याचे दिसून येत आहे. शहरातील पाईपलाईन रोड आणि गुलमोहर रोड या परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते मात्र या परिसरात देखील रात्रीच्या वेळी पथदिवे बंद आढळून येत आहेत. 

शहरातील पथदिव्यांसंदर्भात अडचण असेल तर महापालिकेकडून १८००८३३४४१३ या टोल फ्री नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. 


शेअर करा