मोदी आणि भाजप यांनी समाजाची जाहीर माफी मागावी , राहुल गांधींच्या जातीवरून.. 

शेअर करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशभरातील बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवत असून जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी त्यांनी लावून धरलेली आहे म्हणून संतापलेल्या भाजपच्या खासदाराने राहुल गांधी यांचीच जात सभागृहात विचारली होती. राहुल गांधी यांची जात विचारून भाजप खासदाराने एससी एसटी भटके विमुक्त तसेच आदिवासी आणि मागास ओबीसी समाजाचा अपमान केलेला आहे त्यामुळे मोदी आणि भाजप यांनी समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 

मुंबई येथे बोलताना नाना पटोले म्हणाले की ,’ राहुल गांधींना जात विचारल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बहुजन समाजामध्ये भाजपच्या विरोधात तीव्र संताप असून देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केलेली आहेत. भाजप मनुवादी प्रवृत्तीचा पक्ष असून जात विचारणाऱ्या भाजप खासदार अनुराग ठाकूर यांची माफी नको असे राहुल गांधी म्हणाले आहेत. 

जातीनिहाय जनगणना करण्यावर राहुल गांधी ठाम असून कितीही शिव्या दिल्या आणि अपमान केला तरी बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी राहुल गांधी आगामी काळातही लढणार आहेत. अनुराग ठाकूर यांच्या विधानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे ,असेही ते पुढे म्हणाले. 


शेअर करा