उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टीका केलेली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपात महाराष्ट्राला एक मोठा बहुरूपी कलाकार मिळाला असे म्हटलेले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वेशांतर करून भेट घेतली असे वक्तव्य अजित पवार यांनी केलेले होते.
अजित पवार यांच्यावर टीका करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की ,’ अजित पवार यांनी कधी टोपी घालून , गॉगल घालून तर कधी रेनकोट घालून भेटीगाठी केल्या आहेत. महाराष्ट्राला असा बहुरूपी मिळाला त्यापेक्षा महाराष्ट्राचे नाव भूषवणारा उपमुख्यमंत्री मिळायला हवा ,’ असेही ते पुढे म्हणाले.