नेप्तीमध्ये तरुणाचे टोकाचं पाऊल , सिव्हिलला दाखल केलं पण..

शेअर करा

नगरमध्ये एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केलेली आहे. नगर तालुक्यात नेप्ती शिवारातील ही घटना आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , नितीन रंगनाथ ठुबे ( वय 40 वर्षे राहणार नेप्ती ) असे मयत व्यक्तीचे नाव असून नगर तालुका पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. 

नितीन यांनी तीन तारखेला दुपारच्या सुमारास राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले त्यानंतर त्यांची आई लहानुबाई यांनी नातेवाईकांच्या मदतीने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा उपचार सुरू असताना चार तारखेला त्यांचा मृत्यू झाला आहे.


शेअर करा