नगर शहरात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला. आरोपीने केलेल्या अत्याचारानंतर पीडित मुलीला दिवस गेले त्यावेळी हा प्रकार समोर आल्यानंतर नगर तालुका पोलिसात एका तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , राजेश कस्तुरी ( राहणार जाधव मळा बालिकाश्रम रोड नगर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून सदर गुन्हा तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेला आहे.
आरोपीची शहरातील एका अल्पवयीन मुलीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेली होती त्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने विरोध केला त्यावेळी आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिचे लैंगिक शोषण केले. मुलीला दिवस गेल्याचे समजल्यानंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तोफखाना पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.