महाराष्ट्रात सध्या मणिपूरसारखी परिस्थिती म्हणून विधानसभेत किमान.. 

शेअर करा

‘ मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा प्रश्न हा राजकीय प्रश्न आहे मात्र तो सामाजिक प्रश्न झालेला असल्याने गावागावात दोन गट पडलेले आहेत सामाजिक दरी निर्माण झालेली आहे त्यामुळे भविष्यात ओबीसींना राजकीय आरक्षण वाचवायचे असेल तर ओबीसी समाजाचे किमान शंभर आमदार विधानसभेत गेले पाहिजेत ,’  असे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेले आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की ,’ विधानसभेत ठराव मंजूर आणि नामंजूर करायला किमान 145 आमदार लागतात त्यामुळे ओबीसींनी केवळ शंभर आमदार कमीत कमी निवडून देणे गरजेचे आहे आणि एससी एसटीचे आरक्षित जागांवरील 57 आमदार निवडून आले तर ओबीसींच्या विरोधात ठराव घेतला जाणार नाही. 

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की ,’ आरक्षणाचा प्रश्न राजकीय असताना देखील त्यावर तोडगा काढलेला नसल्याने हा प्रश्न सामाजिक बनलेला आहे. आपण आरक्षण बचाव यात्रा काढलेली असून निवडणुकीत त्याचे काय परिणाम भोगायचे ते बघू कारण सध्या परिस्थितीत राज्यात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे असेही ते म्हणाले. 


शेअर करा