वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण बचाव यात्रेचा छत्रपती संभाजीनगर इथे समारोप करण्यात आलेला असून सुमारे 22 जिल्ह्यांमधून आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांनी समारोपाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती.
वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते यांचेही यावेळी जोरदार भाषण झाले. समारोप सभेस प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर, युवा नेते सुजात भाई आंबेडकर यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.