‘ मेक इन इंडिया ‘ ची पोलखोल करत ‘ कू ‘ ने गाशा गुंडाळला 

शेअर करा

ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी भारतात काम करताना राजकीय दबाव असल्याचे वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियावर ट्विटरला बॉयकॉट करण्याविषयी देखील चर्चा सुरू झालेली होती. भारतीय कंपनी असलेली कु हिने ट्विटरला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र अवघ्या काही दिवसात ‘ कु ‘ ला आपला गाशा गुंडाळावा लागलेला आहे. 

3 जुलै 2024 पासून ट्विटरला टक्कर देण्यासाठी सुरु असलेली मायक्रो ब्लॉकिंग साईट कु ही बंद असून या वेबसाईटवर व्हिजिट केले असता आता ही सेवा बंद करण्यात आल्याचा मेसेज येत आहे. 

विशेष बाब म्हणजे ट्विटरसोबत स्पर्धक म्हणून या भारतीय कंपनीच्या पोर्टलवर मेक इन इंडिया म्हणत अनेक भाजप समर्थक नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी देखील अकाउंट उघडली होती मात्र आता पुन्हा एकदा त्यांना ट्विटरकडेच ऍक्टिव्ह रहावे लागणार आहे. 

वेबसाईट बंद करण्यामागील कारण कु ने स्पष्ट केले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचण झाल्याने ही कंपनी ही वेबसाईट आम्हाला बंद करावी लागत आहे असे म्हटलेले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कंपनीसाठी फंडिंग मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो मात्र आम्हालाच नव्हे तर इतर सुमारे 1000 कंपन्यांना स्टार्टअप फंडिंग साठी अडचण असल्याने अखेर दुखद : अंतकरणाने आम्ही हा निर्णय घेत आहोत असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलेले आहे.


शेअर करा