नगर शहरात मुकुंदनगर परिसरात एका अल्पवयीन मुलाचा हौदावर असलेल्या झाकणावर उभे राहिल्यानंतर खेळत असताना पाण्यात पडून मृत्यू झाला त्यानंतर महापालिकेने कारवाई करत मुकुंदनगर मधील काही हौद बुजवून टाकलेले आहे मात्र स्वतःहून नागरिकांनी हौदांना झाकणे बसून घ्यावीत असे देखील आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केलेले आहे.
शहरातील मुकुंदनगर परिसरात एक चार वर्षाचा चिमूरडा खेळत असताना पाण्यात पडला आणि दुर्दैवाने त्यांनी या घटनेत त्याचा मृत्यू झाला. अनेक नागरिक पाण्याचा साठा करण्यासाठी हौद बांधतात मात्र त्याच्या सुरक्षिततेसाठी कुठलीही काळजी घेत नाही त्यामुळे परिसरातील लहान मुलांसाठी असे हौद धोक्याचे ठरत आहे सोबतच शहरातील गटारांच्या झाकणांची देखील भयावह परिस्थिती आहे.
शहरात अनेक ठिकाणी सध्या बांधकामे सुरू असून बांधकामाला पाणी कमी पडू नये यासाठी असे हौद बांधून पाणी साठवले जाते मात्र बांधकाम पूर्ण होईपर्यंत या हौदाच्या सुरक्षिततेकडे कुठलेही लक्ष दिले जात नाही आणि त्यातून दुर्घटना घडण्याची शक्यता वाढत आहे. मुकुंदनगर येथील हौद बांधणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .