बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबैदुल हसन यांचाही राजीनामा, आंदोलनाची तीव्रता थांबेना 

शेअर करा

बांगलादेशमध्ये पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन भारतात आश्रयासाठी आलेल्या शेख हसीना यांनी अद्यापपर्यंत इतर कुठल्याही भारत वगळता इतर कुठल्याही देशाकडे आश्रय मागितलेला  नसून आगामी काळात त्या युरोप सौदी किंवा यूएई मध्ये जाण्याची चिन्हे आहेत. बांगलादेशात स्थापन झालेल्या हंगामी सरकारचं नेतृत्व सध्या मोहम्मद युनूस यांच्याकडे आहे. 

शेख हसीना या भारत समर्थक म्हणून बांगलादेशमध्ये ओळखला जायच्या मात्र त्यानंतर हळूहळू त्यांची लोकप्रियता कमी होत गेली आणि आरक्षणाचे आंदोलन यासाठी निमित्त ठरले. मोठ्या प्रमाणात बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू झाल्यानंतर शेख हसीना भारतात आलेल्या आहेत. आंदोलनाच्या तीव्रतेमुळे बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी देखील राजीनामा दिलेला आहे. 

सद्य परिस्थितीत शेख हसीना यांच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली असून त्यामुळे सहजासहजी इतर कुठलाही देश त्यांना आश्रय देण्यास तयार होईल याची शक्यता नाही या पार्श्वभूमीवर सध्या त्या गाजियाबादच्या हिंडन हवाई तळावर सेफ हाऊसमध्ये आहेत. 


शेअर करा