महिला पोलीस अंमलदाराच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवली पण झालं असं की.. 

शेअर करा

नगरमध्ये महिलांचे दागिने लांबवण्याचे प्रकार अद्यापही सुरू असून धक्कादायक बाब म्हणजे बालिकाश्रम रोडवर एका महिला पोलीस अंमलदाराच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवून चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र महिला पोलिस अंमलदार आणि त्यांच्या मैत्रिणीने पाठलाग करून दोन्ही चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , मोहिनी कांबळे ( राहणार पोलीस मुख्यालय बालिकाश्रम रोड ) असे फिर्यादी महिला यांचे नाव असून तोफखाना पोलिसात विनोद उर्फ जॉनी व वीर जिजाबा उर्फ ओवळ्या भोसले ( वय 19 दोघेही राहणार चिखली तालुका आष्टी जिल्हा बीड ) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. 

फिर्यादी महिला आणि त्यांची मैत्रीण या किराणा खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या होत्या त्यावेळी निलक्रांती चौकात त्या आलेल्या असताना दुचाकीवरून हे दोन्ही चोरटे आले आणि त्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावत धूम ठोकली मात्र आरडाओरडा झाल्यानंतर पाठलाग करून अखेर या दोघांनाही पकडण्यात आले. 


शेअर करा