नगरमध्ये एक खळबळजनक अशी घटना भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात समोर आलेली असून पोलीस कॉन्स्टेबलनेच विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , प्रवीण जगताप असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून पोलीस मुख्यालयातून नुकतीच त्यांची भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बदली झालेली होती. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन केले.
विष प्राशन केल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर सहकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक योगेश राजगुरू यांनी तात्काळ रुग्णालयात त्यानंतर धाव घेतली. प्रवीण जगताप यांनी हा प्रकार का केला हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.