नगर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार , कल्याणमध्ये असल्याचं समजलं अन.. 

शेअर करा

नगरमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी कल्याण इथून अटक केलेली आहे. महिला वकिलाच्या घरी चोरी केल्याच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. 

उपलब्ध माहितीनुसार , किरण कोळपे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून एडवोकेट नाजमीन बागवान यांनी त्याच्या विरोधात कोतवाली पोलिसात फिर्याद दिलेली होती. किरण याच्यावर महिला वकिलाच्या घरात घुसून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम तसेच कोर्टाची कागदपत्रे चोरी केल्याचा आरोप आहे सोबतच आरोपीने आपल्याला मारहाण देखील केली असे बागवान यांनी फिर्यादीत म्हटलेले होते. 

कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि वैद्यकीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेलेले होते त्यावेळी तो तिथून पळून गेला.  कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी त्यानंतर तात्काळ सूत्रे हलवली आणि आरोपी कल्याण मध्ये असल्याची माहिती समजताच  त्याला अटक केली. 

एडवोकेट बागवान यांचा आरोपी हा पक्षकार असून किरण याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. त्याचे वकीलपत्र एडवोकेट बागवान यांनी घेतलेले होते. त्यांच्यातील अंतर्गत वादातून आरोपीने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे. 


शेअर करा