नगर जिल्ह्यात एक धक्कादायक अशी घटना कर्जत तालुक्यात समोर आलेली होती. कर्जत मिरजगाव रस्त्यावर चिंचोली काळदात इथे एका शिक्षकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यात त्यांचा मृत्यू झालेला होता. त्यांच्यासोबत असलेली त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले मात्र हल्ल्यातून बचावली आहेत.
सोमवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान शिक्षक म्हणून काम करत असलेले अशोक प्रभाकर आजबे ( वय 33 सध्या राहणार कर्जत तालुका आष्टी जिल्हा बीड ) हे कर्जतच्या दिशेने येत असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता त्यात त्यांचा मृत्यू झाला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी योगेश विजय आजबे ( वय 27 राहणार शिराळ तालुका आष्टी जिल्हा बीड ) याला अटक केलेली आहे. मयत अशोक आजबे हे सातत्याने त्यांच्या पत्नीत आणि माझ्या प्रेमसंबंध आहेत असं संशय घेत असायचे त्यामुळे आपली बदनामी होत होती म्हणून आपण शिक्षकाचा खून केला अशी कबुली आरोपीने दिलेली खून प्रकरणात इतरही काही अँगल असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस तपास करत आहेत.