नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केट घोटाळ्याची सध्या संपूर्ण राज्यभरात चर्चा असून शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला शेवगाव पोलिसांनी अटक केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , गणेश बाळासाहेब उर्फ बाळकृष्ण कुलट ( राहणार अंतरवली खुर्द तालुका शेवगाव ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात बबन अण्णासाहेब शिरसाट ( वय 40 वर्ष ) यांनी फसवणुकीचा गुन्हा शेवगाव पोलिसात नोंदवलेला होता.
फिर्यादी यांनी तब्बल दोन कोटींची रक्कम शेअर मार्केटमध्ये आरोपीच्या विश्वासावर गुंतवलेली होती मात्र आरोपीने परतावा देण्यास टाळाटाळ केली त्यानंतर अखेर प्रकरण पोलिसात पोहोचले. आरोपी हा गंगापूर येवला रस्त्याच्या बाजूला एका हॉटेलवर पार्टी करत असल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे.