कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी दिली जागा , एकावर गुन्हा दाखल

शेअर करा

नगर शहरात ठिकठिकाणी कॅफेच्या नावाखाली मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी केबिन उपलब्ध करून देण्याचे प्रकार सातत्याने सुरू असून नगर मनमाड रस्त्यावरील एका कॅफेवर तोफखाना पोलिसांनी कारवाई केलेली आहे. ११ तारखेला ही कारवाई दुपारच्या सुमारास करण्यात आली. 

पोलीस अंमलदार सतीश त्रिभुवन यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर कॅफेचा मालक असलेला सागर अशोक उदमले ( वय 28 राहणार हिवरे झरे तालुका नगर ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी एका गाळ्यात त्याने जागा उपलब्ध करून दिली असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 


शेअर करा