मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ,’ मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण हा केंद्राचा विषय नाही तर राज्याचा विषय आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत. इतर जातींच्या पोट जातीचा आरक्षणात समावेश झाला मग मराठ्यांची पोट जात असलेल्या कुणबीचा समावेश का होऊ शकत नाही ?, सगे सोयरे आणि ओबीसी कोट्यातून आरक्षण या मागणीवर आम्ही ठाम आहोत ,’ असे म्हटलेले आहे.
मनोज जरांगे पाटील शिर्डी इथे बोलताना म्हणाले की ,’ महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुती दोन्ही आघाड्या याबाबत वेळ मारून देत असून 29 तारखेला पुढील रणनीतीची घोषणा करण्यात येईल , असेही ते पुढे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून प्रवीण दरेकर टीका करतात . मागच्या दारानी जे स्वतः आमदार झालेले आहेत त्यांनी दुसऱ्याच्या ऐकून टीका करू नये. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्या मराठा आमदारांना येता विधानसभा निवडणुकीत धडा शिकवू , असेही ते पुढे म्हणाले.