भाजप आमदाराचा भाऊ चप्पल घालून मंदिरात, लोक प्रक्षोभक झाल्याने ‘ राडा ‘ : कुठे घडली घटना ?

शेअर करा

कोरोनामुळे गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे अखेर खुले करण्यात आली आहेत मात्र कोरोना नियमावली तर सोडाच तर चक्क मंदिराबाहेर चप्पल काढण्याचे देखील पालन भाजप नेत्यांकडून केले जात नसल्याचा एक प्रकार समोर आला आहे. सांगलीमध्ये चप्पल घालून मंदिरात गेल्याच्या कारणावरून आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी इथं दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांनी चप्पल घालून मंदिरात प्रवेश केला होता असे सांगण्यात येत आहे . त्यावरूनच वादाला सुरुवात झाली अशी माहिती आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी गावात 17 नोव्हेंबर रोजी दुपारी गावातील महालिंगराय मंदिरात ही घटना घडली. आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकर हे दुपारी आपल्या मित्रांसह मासाळवाडी येथील मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिर सुरू करण्यात आल्यामुळे मंदिराच्या परिसरात साफ-स्वच्छता करण्यात आली होती. पण, ब्रम्हानंद आणि त्यांचे मित्र चपला घालून मंदिरात गेले होते. ही बाब स्थानिक लोकांच्या लक्षात आली आणि त्यांनी पडळकर यांना चप्पल बाहेर काढण्याची विनंती केली.

पडळकर यांनी उलट प्रश्न करत वाद घालण्यास सुरुवात केली आणि यावरून दोन्ही गटामुळे काही वेळातच मारामारीला सुरुवात झाली असे दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे. दोन्ही गटामध्ये रस्त्यावरच तुफान हाणामारी झाली. या धुमश्चक्रीत गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. त्यामुळे गावात एकच गोंधळ उडाला होता.आटपाडी गावात राहणाऱ्या शांताबाई मारुती मासाळ यांनी आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या घटनेत मंगळसूत्र आणि मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या गाडीतील 82 हजार लांबवण्याचे या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून ब्रह्मानंद पडळकर, गणेश भुते नवनाथ मारुती सरगर, अनिल सूर्यवंशी, विठ्ठल पाटील आणि सत्यजीत पाटील या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या गटाकडून देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून आटपाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या एकूण 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आणि यामध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांचा समावेश आहे. दरम्यान, ब्रह्मानंद पडळकर यांनी या घटनेशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.दरम्यान मंदिरात चप्पल घालण्यावरुनच ही हाणामारी झाली की याचे काही इतर कारण होते, याचा तपास पोलीस करत आहे


शेअर करा