जागा १२५७ अन अर्ज तब्बल.., बेरोजगारी हा मोदी सरकारच्या कार्यकाळातील अभिशाप

शेअर करा

देशात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून बेरोजगार तरुणांचा आक्रोश हा केंद्र सरकारसोबत राज्य सरकारची देखील डोकेदुखी ठरतो आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात बेरोजगारी हा सगळ्यात मोठा अभिशाप असल्याची टीका केलेली आहे. 

मल्लिकार्जुन खरगे यांनी नवी दिल्ली येथे बोलताना ,’ जनसंपर्कासाठी हे सरकार केवळ रोजगाराची आकडेवारी जनतेसमोर देत आहे. मुंबई पोलिसात शिपाई आणि वाहन चालक १२५७ जागांसाठी तब्बल एक लाख 11 हजार अर्ज प्राप्त झालेले होते. 

मल्लिकार्जुन खर्गे पुढे म्हणाले की ,’ दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देणार असे भाजपने आश्वासन दिले होते मात्र रोजगार निर्मिती करण्यात त्यांना अपयश आलेले आहे .’ 


शेअर करा