आईचा मृत्यू झाल्यानंतर मानसिक धक्का बसलेल्या सख्ख्या बहिण भावाने कोल्हापूरमध्ये राजाराम तलावात उडी मारून टोकाचे पाऊल उचलले त्यात दोन्ही बहिण भावांचा मृत्यू झालेला आहे . पंधरा तारखेला त्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आले.
उपलब्ध माहितीनुसार , भूषण निळकंठ कुलकर्णी ( वय 61 ) आणि एडवोकेट भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी ( वय 57 दोघेही राहणार नाळे कॉलनी संभाजीनगर ) बहीण भावांची नावे असून आईचा विरह सहन न झाल्याने आपण टोकाचे पाऊल उचलत आहोत असे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे.
दोन्ही बहिण भावांनी एकमेकांच्या हाताला दोरी बांधून त्यानंतर पाण्यात उडी मारली त्यात दोघांचाही मृत्यू झाला. भूषण कुलकर्णी हे सीमा शुल्क अधिकारी म्हणून निवृत्त झालेले होते तर भाग्यश्री गोखले या कोल्हापुरातील एका महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. आईची सेवा करण्यासाठी दोघांनी लग्न केले नव्हते अशी माहिती समोर आलेली आहे.
कुलकर्णी बहिण भावांनी अनेक ठिकाणी अनाथ मुला-मुलींसाठी काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना आर्थिक मदत देखील केलेली होती आणि सामाजिक कार्यात देखील दोघेही बहिण भाऊ सक्रिय होते.