‘ देवेंद्र फडणवीस यांचा मुका घ्या ‘ अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्यांवर केलेली होती त्यावर भाजप नेते प्रसाद लाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केलेला असून त्यामध्ये ,’ आमचे आम्ही पाहून घेऊ तुम्ही शरद पवारांचा मुका घेणे आधी बंद करा ‘, असे म्हटलेले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या निशान्यावर सत्ताधारी भाजप नेते मोठ्या प्रमाणात सध्या दिसून येत आहेत .मनोज जरांगे हे भाजप नेत्यांना अरे तुरे करत असभ्य बोलले आहेत असा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात आहे.
भाजप नेत्यांनी आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर कठोर टीका करण्यास सुरुवात केलेली असून देवेंद्र फडणवीस सूडाच्या भावनेने वागत नाही पण आंदोलनातून तुम्ही किती खुनशी आहात असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलेले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी प्रवीण दरेकर यांना मागच्या दारांनी आलेल्यांनी इतरांच्या सांगण्यावरून बोलू नये असे म्हटलेले होते.