बायकोने मला मारण्यासाठी गुंडांना सुपारी दिलीय .. ‘ ह्या ‘ भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

  • by

पत्नीचा आपल्या संपत्तीवर डोळा आणि पैसा हडप करण्यासाठी आपल्याला मारण्याची सुपारी तिने दिली आहे, असा खळबळजनक आरोप भाजपच्या नेत्याने केला आहे. एवढंच नाही तर पत्नीविरोधात त्यांनी पोलिसात तक्रारसुद्धा दाखल केली आहे. उत्तर प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनुपसिंह ठाकूर यांनी केलेल्या तक्रारीवरून उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशातल्या बलिया इथले ते भाजपचे नेते आहेत. पत्नीनेच आपल्याला मारण्यासाठी गुंडाला सुपारी दिल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दाखल केली होती. पोलिसांनी यासंदर्भात एफआयआर नोंदवून घेतली आणि कथित गुंडाला अटकही केली आहे. विकास लोहाक आणि छोटे सिंह अशी या गुंडांची नावे असून त्यांच्यावर भाजप नेते ठाकूर यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.पोलीस या दोघांकडे अधिक चौकशी करून तपास करत आहेत.

अनुप सिंह आणि त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कलह सुरू होता. हे पती-पत्नी यासाठी फॅमिली कोर्टातही गेले होते. त्यांचा खटला सुरू आहे. दरम्यान पत्नीने आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप अनुप सिंह यांनी केला. छोटे सिंह आणि विकास लोहार यांनी आपली सुपारी घेतल्याचं अनुप सिंह यांचं म्हणणं आहे. यासाठी पत्नीने या दोघा कथित मारेकऱ्यांना भरपूर रक्कम देऊ केली असल्याचाही त्यांचा आरोप आहे. याचा पुरावा म्हणून त्यांनी पोलिसांना एक ऑडिओ क्लिप असल्याचं सांगितलं आहे मात्र प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.