विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून शहरात लोकप्रतिनिधींचा ‘ रस्ता विकास ‘ 

शेअर करा

नगर शहरात ज्या पद्धतीने सध्या रस्त्याची कामे सुरू करण्यात आलेली आहेत त्या पाठीमागे केवळ आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकारण दिसून येत आहे.  ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीचे फोटो आणि फ्लेक्स लावलेले असून बरोबर निवडणुकीच्या आधी ही कामे पूर्ण होण्याचा अंदाज आहे. 

गेली पाच वर्ष नगरकरांनी ज्या पद्धतीने खड्ड्यांमधून रस्ता शोधत प्रवास केलेला आहे त्याला तोड नाही. शहरातील एकही प्रभाग आजही खड्डाविरहित राहिलेला नाही. मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अनेकदा अपघात झाल्यानंतर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना जाग आली आणि झटपट विकास निधी मिळवून कामे सुरू करण्यात आली. 

नगर शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेली गुंडगिरी अन त्याला मिळणारे राजकीय अभय यातून शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती सोकावत चाललेल्या असून नगरमध्ये जागांची ताबामारी , अनधिकृत बांधकामे या पाठीमागे राजकीय वरदहस्त निश्चितच आहे.  महापालिकेचे तत्कालीन आयुक्त पंकज जावळे हे अद्यापही फरार असून शहरातील बांधकाम परवाने हे डोळे झाकून दिल्याचे अनेक प्रकरणात समोर आलेले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या विकास कामाचे असे लॉलीपॉप नगरकरांना कितपत भावेल हे आगामी निवडणुकीत दिसून येईलच.


शेअर करा