महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना ठाणे जिल्ह्यातील बदलापूर इथे समोर आलेली असून चक्क शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आलेला करण्यात आलेला आहे. एका अल्पवयीन मुलीचे वय चार वर्षे तर दुसरीचे वय सहा वर्षे आहे. आरोपी हा सफाई कर्मचारी म्हणून या शाळेत काम करत होता. सदर शाळा ही एका भाजप कार्यकर्त्याची असल्याची प्राथमिक माहिती आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केलेला असून ,’ बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार घटना ही काही पहिली घटना नाही. गेल्या काही दिवसांपासून देशात आणि महाराष्ट्रात अशा घटना वाढतच चाललेल्या आहेत. आप – आपसातल्या भांडणामध्ये आणि एकमेकांचे पक्ष फोडण्यामध्ये एवढे व्यस्त आहेत की यांनी महाराष्ट्रातल्या महिलांचा सुरक्षेचा प्रश्न वेशीवर टांगला आहे यामुळे वारंवार बदलापूर सारख्या घटना घडत असून पोलीस आणि सरकारची भीती गुन्हेगारात राहिलेली नाही ,’ अशी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे .
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटनेसाठी जबाबदार ठरवत फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी आरोपी भाजपशी संबंधित आढळला तरी त्याला पाठीशी घालण्यात येणार नाही असे सांगितलेले आहे सोबतच विरोधी पक्षांनी अशा बाबतीत राजकारण आणू नये असेही म्हटलेले आहे.