अहमदनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे हे लाचखोरी प्रकरणात अडकल्यानंतर त्यांना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन नामंजूर केलेला होता. पंकज जावळे यांनी त्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली आणि अखेर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना खोट्या गुन्हा दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप काही व्यक्तींकडून करण्यात आलेला होता. पंकज जावळे यांचे स्वीय सहाय्यक शेखर देशपांडे यांच्यामार्फत जावळे यांनी लाच मागितली असा आरोप जावळे यांच्यावर आहे .
संबंधित व्यक्ती यांनी त्यानंतर जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि त्यानंतर सुगावा लागताच पंकज जावळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक फरार झालेले आहेत जे अद्यापही पोलिसांना मिळून आलेले नाहीत. पोलिसांच्या देखील कार्यशैलीवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.