नगरमध्ये तरुणीचं टोकाचं पाऊल , केडगावमध्ये घडली घटना

शेअर करा

नगर शहरात एक धक्कादायक अशी घटना केडगाव परिसरात समोर आलेली असून घरातील छताच्या लोखंडी हुकला ओढणीने गळफास घेऊन एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आहे. केडगाव उपनगरातील अमित नगर येथील ही घटना आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , प्रणिता पाटील ( वय 18 ) असे मयत तरुणीचे नाव असून कोतवाली पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. शनिवारी 17 तारखेला दुपारी ही घटना घडलेली असून घटना घडल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले होते मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता . 


शेअर करा