निवडणुकीच्या बरोबर आधी नगरकरांना ‘ विकास ‘ दिसणार , कामे सुरू दर्जाचं काय ? 

शेअर करा

नगर शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे शहरात सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी पहायला मिळत आहे. 

गेली पाच वर्ष खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या नगरकरांना दिवाळीच्या मुहूर्तावर निवडणुकीच्या बरोबर आधी विकास पाहायला मिळणार आहे. प्रत्येक कामाचे क्रेडिट घेणाऱ्या लोकप्रतिनिधीने स्वतःचे फ्लेक्स प्रत्येक कामाच्या ठिकाणी लावून आगामी निवडणुकीत आपण कशाच्या भरवशावर मते मागणार आहोत याचाही अंदाज नगरकरांना दिलेला आहे.विशेष बाब म्हणजे याच लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्यांच्या प्रभागात कामांना वेग आलेला आहे. 

गेली पाच वर्ष नगरकरांना निरुपयोगी अशा सामाजिक उपक्रमात झुलवत ठेवून स्वतःच्या टोळक्यांचे खिसे गरम करण्यापलीकडे कुठलेही मोठे काम शहरात झालेले नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात निधी आणून ही कामे करण्यात येत असली तरी यापूर्वी झालेल्या विकास कामांचा अवघ्या दोन दिवसाच्या पावसात बोजवारा उडालेला आहे. नगरमध्ये ठिकठिकाणी वाहतूक व्यवस्था प्रचंड कोलमडलेली असून ट्राफिक जाममुळे नगरकर हैराण झालेले आहेत. 


शेअर करा