कंगना राणावत हाजीर हो . ‘ ह्या ‘ तारखेला हजर होण्याचे मुंबई पोलिसांचे तिसऱ्यांदा समन्स मात्र ..

  • by

सातत्याने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राविषयी गरळ ओकणारी कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंदेल हिला मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स जारी केले आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात कंगनाला २३ तर रंगोली हिला २४ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. तिसऱ्यांदा समन्स जारी करण्यात आलेले असले तरी कंगनाने याआधी देखील मुंबई पोलिसांच्या समन्सला कोणतीच दाद दिलेली नाही त्यामुळे आता मुंबई पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अर्णब सारखीच कठोर कारवाई कंगनावर केली जावी असे महाराष्ट्राचे जनमत असून पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .

न्यायालयाच्या आदेशानुसार कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी कंगनाला २६ ऑक्टोबर आणि २७ ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, दोघींनीही चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला होता. त्यानंतर, १० नोव्हेंबर रोजी कंगनाला आणि रंगोली हिला ११ नोव्हेंबर रोजी हजर राहावे, अशी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, कंगनानं भावाच्या लग्नाचं कारण पुढे करत चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला होता.

मुंबई पोलिसांकडून कंगनाला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहेत. कंगनाकडून अद्याप या समन्सला उत्तर देण्यात आले नाहीये. त्यामुळं कंगना यावेळी तरी चौकशीसाठी हजर राहणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोशल मीडियावर कंगना राणावत हिनं केलेल्या एका आक्षेपार्ह ट्वीटविरोधात दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.