नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना श्रीगोंदा तालुक्यात समोर आलेली असून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत कोळगाव शिवारात चार जणांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याकडील अडीच लाख रुपये देखील चोरट्यांनी लुटून नेले.
उपलब्ध माहितीनुसार , पनवेल येथील चार जणांना कोळगाव तालुक्यातील पांढरेवाडी येथे बोलावून घेण्यात आलेले होते. स्वस्तात सोने मिळेल या आशेने आलेल्या व्यक्तींना इथे आल्यावर मात्र बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला त्यानंतर बेलवंडी पोलिसात याप्रकरणी खबर देण्यात आली.
श्रीगोंदा तालुक्यात गेल्या काही वर्षात अशा अनेक घटना समोर आलेल्या असून स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवत मुंबई पुण्यासारख्या ठिकाणावरून एखाद्याला बोलावून घ्यायचे आणि त्यानंतर मारहाण करायची अनेकदा घडलेले आहेत. फिर्यादी व्यक्ती यांनी मारहाण होऊन रक्कम लुटल्यानंतर देखील गुन्हा दाखल करण्यात असमर्थता दर्शवल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.