नगर जिल्ह्यात बेकायदा सावकारी बोकाळलेली पहायला मिळत असून श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान इथे सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यावसायिक व्यक्तीने औषध विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , विशाल विठ्ठल हाळनोर असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यवसायिकाचे नाव असून त्यांचे एक मेडिकल शॉप आहे. व्यावसायिक कारणासाठी त्यांनी सावकाराकडून पैसे घेतलेले होते मात्र तरीदेखील सावकाराकडून पैसे परत केल्यानंतर देखील जाच थांबत नव्हता.
विशाल यांनी विष प्राशन करण्यापूर्वी दिलेल्या नोटमध्ये आरोपी सावकाराने आपल्या मेडिकलच्या गाळ्याची नोटरी बळजबरीने करून घेतली आणि त्यानंतर देखील पैसे उकळण्यासाठी सातत्याने त्रास सुरू होता असे म्हटलेले आहे. तीस ते पस्तीस लाखांचे कर्ज त्यांच्यावर असून सावकाराच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हा प्रकार केलेला आहे. सावकारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी कुटुंबीयांनी मागणी केलेली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.