अखेर ‘ त्या ‘ गव्हाणेला जन्मठेपेची शिक्षा , स्वतःच्या भावाला शेतीच्या कारणावरून..

शेअर करा

नगर जिल्ह्यात शेतीच्या वादातून भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायाधीश यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. दोन नोव्हेंबर 2022 रोजी पाथर्डी तालुक्यात ही घटना घडलेली होती. 

उपलब्ध माहितीनुसार , दिनकर अण्णाजी गव्हाणे ( वय 65 तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी सरकारतर्फे न्यायालयात बाजू मांडली. 

फिर्यादी व्यक्ती शहाबाई मधुकर गव्हाणे या त्यांचे पती मधुकर अण्णाजी गव्हाणे यांच्यासोबत शेतात राहत होत्या. त्यांच्या शेताजवळ दिनकर अण्णाजी गव्हाणे हा देखील कुटुंबासोबत राहायचा आणि शेतीवरून भांडण झाल्यानंतर आरोपी दिनकर गव्हाणे आणि त्याचा पुतण्या संतोष माणिक गव्हाणे यांनी मधुकर यांना मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. 

सदर प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकार पक्षाच्या वतीने अकरा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाचे पुरावे ग्राह्य धरत जिल्हा न्यायाधीश सुधाकर यर्लागडा यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 


शेअर करा