भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे एडवोकेट उज्वल निकम यांना बदलापूर प्रकरणात सरकारी वकील म्हणून नेमण्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतलेला आहे. उज्वल निकम यांनी मात्र प्रत्युत्तर देताना ‘ मी गुन्हेगारांना शिक्षा देणारा वकील आहे अशा आरोपांनी माझे मन मनोधैर्य खच्ची होत नाही ,’ असा युक्तिवाद केलेला आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ,’ उज्वल निकम हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. संबंधित शाळा भाजप आणि संघ परिवाराशी संबंधित असल्याकारणाने संस्था चालकांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येईल त्यामुळे या प्रकरणात उज्वल निकम यांना वकील करणे योग्य राहणार नाही’, असे म्हटलेले होते तसेच सुषमाताई अंधारे यांनी देखील , कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता वकील म्हणून नको ,’ असे म्हटलेले होते.
उज्वल निकम म्हणाले की ,’ मी वकिली करतो तेव्हापासून गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठीच काम केलेले आहे आणि गुन्हेगारांना शिक्षा होईल असा युक्तिवाद केलेला आहे. न्यायालयाने तो मान्यही केलेला आहे. संवेदनशील विषयाचे राजकारण करणे योग्य नाही ,’ असेही ते पुढे म्हणाले.