बदलापूर येथील संतापजनक घटनेनंतर राज्य सरकारने तपासासाठी एसआयटीची नेमणूक केलेली होती त्यानंतर आता या शाळा प्रशासनाच्या विरोधातच पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
सफाई कर्मचारी म्हणून काम करणारा अक्षय शिंदे याला अटक करण्यात आलेली असून शाळा प्रशासनाने वास्तविक पोलीस प्रशासनाकडे तक्रार करणे गरजेचे होते मात्र तक्रार करण्यासाठी कुठलीच पावले शाळेच्या प्रशासनाने उचलली नाहीत. शाळा व्यवस्थापन यांनी कायद्याचे योग्य पालन केलेले नाही हे स्पष्ट असून शाळेच्या विरोधात देखील आता पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर शाळा वीस तारखेपासून बंद असून इतर विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे शाळा लवकर सुरू करावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केलेली आहे मात्र शाळेची पुन्हा तोडफोड होण्याची भीती असल्याकारणाने अद्यापपर्यंत शाळा सुरू करण्यात आलेली नाही.