आमदार संग्राम जगताप..भर पावसातला तुमचा विकास नागरिकांची डोकेदुखी वाढवतोय

शेअर करा

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आलेली शहरातली रस्त्याची कामे सध्या नागरिकांची प्रचंड डोकेदुखी वाढवत आहेत. पाच वर्षांपासून ठप्प झालेला विकास निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भर पावसात सुरू झाला आणि खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी नगर शहरात निर्माण झालेली आहे. 

आमदार संग्राम जगताप यांनी विकास निधी आणल्यानंतर ही कामे सुरू करण्यात आलेली असल्याचा दावा करण्यात आला असला तरी या कामांचा वेग हा कासवगतीने सुरू आहे आणि यापूर्वी करण्यात आलेल्या कामांचा दर्जा पाहता अवघ्या दोन महिन्यातच रस्त्यांची लागलेली वाट नगरकरांनी पाहिलेली आहे अशा परिस्थितीत जुनेच रस्ते बरे होते की काय ? अशी परिस्थिती सध्या शहरात आहे. 

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून नगर शहरात सतत पाऊस सुरू असून काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत आणि जे काही थोडेफार रस्ते वाचलेले होते त्यात विकास कामाच्या नावाखाली खड्डे खोदून ठेवलेले आहेत . डेंगू चिकनगुनियाने हैराण झालेल्या नगरकरांना खड्ड्यातील रस्त्यांमधून प्रवास करण्याची दुर्दैवी वेळ या निमित्ताने आलेली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी रस्त्याची विकास कामे 24 तास चालू ठेवून लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी मागणी नगरकर करत आहेत . 


शेअर करा