कोल्हापूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला , बुधवारपासून होती गायब

शेअर करा

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अमानुषपणे हत्या केल्याची घटना समोर आलेली आहे . कसबा बावडा रोडवरील श्रीराम नगर येथील हॉटेलच्या पाठीमागे एका शेतात तिचा मृतदेह आढळून आलेला आहे. संबंधित मुलगी ही बुधवारी दुपारपासून बेपत्ता झालेली होती. 

उपलब्ध माहितीनुसार , शिरोली एमआयडीसीमध्ये मयत मुलीचे कुटुंबीय मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. सदर दांपत्य हे परप्रांतीय असून तीन मुली आणि दोन मुले असा त्यांचा परिवार आहे .मुलीचे वय हे दहा वर्ष असून कुटुंबातील ती सर्वात मोठी होती. 

21 तारखेला आई वडील कामावर गेले त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास मुलीच्या मामाने मुलीला मोबाईल दिला आणि त्यानंतर तो स्वतःच्या खोलीत आराम करण्यासाठी गेला मात्र दुपारी साडेतीनच्या सुमारास मुलगी दिसली नाही म्हणून आईला बोलावून घेण्यात आले . तपास सुरू केला मात्र तरीही मुलगी आढळून आली नाही. पोलिसांनी त्यानंतर तक्रार दाखल करून घेतली आणि तपास सुरू असताना तिचा मृतदेह आढळून आला. 


शेअर करा