अकस्मात नव्हे तर खून , आरोपी शिक्षकाची चलाखी अशी आली समोर

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर इथे समोर आलेली असून कर्जाचे हप्ते देण्यासाठी माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून एका दारुड्या शिक्षकाने पत्नीचा गळा आवळून खून केलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सीमा आदिनाथ कुटे ( वय 35 वर्ष राहणार  तालुका खेड ) असे मयत महिलेचे नाव असून आदिनाथ सुखदेव कुटे ( वय चाळीस वर्ष तालुका खेड मूळ राहणार निर्मल नगर अहमदनगर ) असे आरोपीचे नाव आहे. 

आरोपी आदिनाथ यास अनेक वर्षांपासून दारूची सवय लागलेली होती आणि त्यानंतर पैशासाठी त्याने पत्नीला छळण्यास सुरुवात केली. 19 ऑगस्ट रोजी दारू पिऊन आल्यानंतर त्यांनी दारूच्या नशेत सीमा हिचा गळा आवळला आणि बेडरूमच्या दरवाजाची कडी आतून चलाखीने लावली आणि तिने आत्महत्या केली असा बनाव निर्माण केला. 

काही वेळात नागरिक तिथे जमले आणि दरवाजा तोडून सीमा हिचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी देखील आकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र पोस्टमार्टम अहवालात गळा आवळल्याचे समोर आल्यानंतर आरोपीवर संशय आला म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे.


शेअर करा