सासऱ्याला जावयाने तब्बल ‘ इतक्या ‘ लाखांना लावला चुना , आता प्रकरण पोलिसात

शेअर करा

फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार पुण्यात समोर आलेला असून व्यवसायासाठी म्हणून सासऱ्याला तब्बल 83 लाख 68 हजार रुपये कर्ज काढण्यास भाग पाडले आणि जावयाने त्यांची फसवणूक केली. निगडी परिसरातील ही घटना आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , चेतन दत्तात्रय मोरे ( वय तीस वर्ष राहणार जांभुळवाडी रोड विठ्ठलवाडी ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या पत्नीने निगडी पोलिसात तक्रार दिली आहे. 

आरोपी चेतन याचा पहिला विवाह झालेला होता आणि कायदेशीर घटस्फोट देखील झाला नाही मात्र ही बाब लपवून ठेवत त्याने फिर्यादी यांच्यासोबत लग्न केले आणि फिर्यादी यांना नांदायला घरी तर घेऊन गेला नाही उलट फिर्यादी यांच्या वडिलांकडून वेगवेगळी कारणे सांगत पैसे घेतले. 

पुढे कौटुंबिक वाद सुरू झाल्यानंतर आरोपीने सासऱ्यास पैसे देण्यास नकार दिला आणि फिर्यादी यांनी विचारणा केली त्यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी जावयाने आतापर्यंत 83 लाख 68 हजार रुपयांचे कर्ज सासऱ्याला काढण्यास भाग पाडले होते. 


शेअर करा