… आणि अखेर काही तासांतच रिक्षात सापडलेल्या ‘ कुबेराचा खजिना ‘ चे रहस्य उलगडले

शेअर करा

पेट्रोलिंग दरम्यान संशयितास फिरताना आढळून आलेल्या रिक्षाचालकाची तपासणी केली असता पोलिसांना रिक्षात चक्क सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली एक बॅग आढळून आली होती. नगर शहरात हा प्रकार घडला होता सुमारे 56 लाख रुपयांचे हे सोने असल्याचे पोलिसांनी सांगितले होते त्यानंतर रिक्षा चालकाला अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी अधिक चौकशी केली तेव्हा, नगरमधील सराफ बाजारातील ओमप्रकाश वर्मा यांचे हे दागिने असल्याचे समोर आले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिसांचे पथक शहरातील बाबा बंगाली परिसरात पेट्रोलिंग करत होते याच वेळी एक ऑटोरिक्षा संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आली. पोलीस रिक्षाचालकाकडे विचारपूस करू लागले तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेत त्याची झडती घेतली तेव्हा रिक्षामध्ये 56 लाख रुपये किमतीचे सुमारे एक किलो 386 ग्रॅम सोने आढळून आले. रिक्षाचालक फैरोज रफिक पठाण राहणार बाबा बंगाली याला अटक केली

तपासणीदरम्यान फैरोज पठाण याने गंज बाजार परिसरात ही सोन्याची बॅग आपल्याला सापडली असल्याची पोलिसांना सांगितले. दरम्यान पोलिसांनी या सोन्याबाबत गंज बाजार परिसरात चौकशी केली तेव्हा ओमप्रकाश वर्मा या सराफाची ही बॅग असल्याचे समजले. वर्मा हे दुकानाच्या पायरीवर ही बॅग विसरले होते, त्यानंतर ही बॅग सदर रिक्षाचालकाला सापडली असे कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश माणगावकर यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश माणगावकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे , पोलीस नाईक गोरक्षनाथ काळे , योगेश भिंगारदिवे , शाहिद शेख , प्रमोद लहारे ,सुजय हिवाळे ,सुमित गवळी,भारत इंगळे रियाज इनामदार यांच्या पथकाने ही कारवाई केली

काय आहे प्रकरण ?

पेट्रोलिंग सुरु असताना एक संशयास्पद परिस्थितीत चाललेली रिक्षा पोलीस कर्मचाऱ्यांना आढळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडून रिक्षाची झडती घेतली असता तब्बल ५६ लाख रुपयांचे सुमारे एक किलो वजनाचे सोन्याचे दागिने त्या रिक्षात सापडले. बातमी नगर शहरातील असून या रिक्षाचालकास अटक करण्यात आली आहे . संशयास्पदरित्या रिक्षामध्ये तब्बल ५६ लाख ८९ हजार ६९० रुपये किंमतीचे १ किलो ३६८ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असणारा रिक्षाचालक फैरोज रफिक पठाण (रा. बाबा बंगाली घर नंबर ७१६, नगर) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली . कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उपलब्ध माहितीनुसार, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये कडक सुरक्षा उपाययोजना केलेली असल्याने मार्गदर्शक सुचना प्रमाणे कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी सोमवारी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची ऑटो रिक्षा नगरच्या बाबा बंगाली परिसरात संशयास्पद रित्या फिरत असतांना पोलिसांना दिसून आली. रिक्षा थांबवून संबंधित रिक्षा चालकाकडे विचारपूस करीत असताना रिक्षा चालक पळून जाऊ लागला मात्र कर्मचाऱ्यांनी त्यास पकडले आणि चौकशी सुरु केली.

चौकशीदरम्यान याने त्याचे नाव फैरोज रफीक पठाण असे सांगितले आणि त्यानंतर रिक्षाची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे ५६ लाख ८९ हजार ६९० रुपये किंमतीचे सोन्याचे १ किलो ३६८ ग्रॅम वजनाचे दागिने मिळून आले. रिक्षा चालकाकडे या दागिन्यांबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच दागिन्यांच्या मालकी हक्काबाबत त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र आढळले नाहीत. त्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून फैरोज रफीक पठाण याला पोलिसांनी अटक केली . आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, ही दागिन्याची बॅग नगरच्या गंजबाजार येथील परिसरात सापडली असल्याची माहिती त्याने दिली होती.


शेअर करा