एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवार देणार का ? राज ठाकरे म्हणाले की..

शेअर करा

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मनसे नसल्याचा पुन्हा एकदा पुनरुचार केलेला असून महाविकास आघाडी आणि महायुतीचे गलिच्छ राजकारण सगळ्यांनीच पाहिलेले आहे. परिस्थिती मनसेसाठी पोषक आहे त्यामुळे आम्ही 225 जागा विधानसभेत लढणार आहोत असे म्हटलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील विरोधात आम्ही उमेदवार उभे करणार असे राज ठाकरे यांनी म्हटलेले आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सध्या दौऱ्याला सुरुवात केलेली असून नागपूर येथे बोलताना ते म्हणाले की ,’ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सरकारला फायदा होईल असे वाटत नाही. लोकांना काम हवे आहे त्यांना काम द्या ते फुकट पैसे मागत नाहीत. शेतकरी देखील फुकट वीज मागत नाही. मत पाहिजे म्हणून मोफत देतात . लोकांनी केलेल्या कराचे पैसे वाटप केले जात आहे असे कसे चालणार ? 

मध्यप्रदेशात देखील लाडकी बहिण योजनेमुळे यश मिळाले असे नाही. दिवाळीनंतर निवडणूक जाहीर होईल असे वाटते मात्र आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत निवडणुकीची खात्री नाही. आमच्या पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी हा दौरा सुरू असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले सोबतच मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलण्यास राज ठाकरे यांनी नकार दिला . 


शेअर करा