बदलापूर येथील घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झालेले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये येत्या महिन्याभरात सीसीटीव्ही बसवले नाहीत तर संबंधित शाळांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात येईल असा स्पष्ट इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेला आहे.
अशोक येरेकर यांनी याप्रकरणी अधिक माहिती देताना , ‘ प्रत्येक शाळेची पहिली जबाबदारी ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची असून अशा प्रकारच्या घटना आगामी काळात घडू नयेत यासाठी मुख्याध्यापकांनी याबद्दल माहिती देण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करावे . शाळेमध्ये केवळ सीसीटीव्ही फुटेज बसवणे गरजेचे नाही तर ठराविक कालावधीनंतर तपासणी देखील करावी त्यात काही आक्षेपार्ह आढळले तर पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा अन्यथा आगामी काळात असा प्रकार घडल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येईल ,’ असा इशारा दिलेला आहे
शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी याप्रकरणी माहिती देताना , ‘ प्रत्येक जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासोबत सखी सावित्री समिती गठित करून शाळांमधील सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत . शाळेत येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची देखील चारित्र्य पडताळणी करून घेण्यात यावी अन्यथा या शाळांवर कारवाई करण्यात येईल. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या छायाचित्रासोबत सर्व माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देखील देण्यात यावी जेणेकरून अशा स्वरूपाच्या घटना आगामी काळात टाळल्या जाऊ शकतील,’ असे सांगण्यात आलेले आहे.