नगर शहरात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून सावेडी उपनगरातील सपकाळ चौकात लहान भावाने मोठ्या भावाचा अत्यंत अमानुषपणे खून केलेला आहे. सोमवारी 26 तारखेला रात्री ही घटना घडली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , शुभम उर्फ बंड्या मुळे असे आरोपीचे नाव असून त्याचा भाऊ सोपान मुळे याच्यासोबत वाद झाल्यानंतर सोपान यांच्या डोक्यावर धारदार शास्त्राने वार केला त्यात सोपान गंभीर जखमी झालेले होते. जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे.
नगर शहरात किरकोळ कारणावरून कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. तोफखाना पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोन्ही भावांमधील वादाचे कारण काय होते हे अद्याप पर्यंत समोर आलेले नाही.