नगर तालुक्यातील सावेडी येथील मंडल अधिकारी म्हणून काम करणाऱ्या शैलजा देवकाते व तलाठी सागर भापकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला मात्र तरीही त्या पदावर कार्यरत असल्याने शिवप्रहार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेले होते.शिवप्रहार संघटनेच्या उपोषणाची दखल घेत शैलजा देवकाते आणि त्यांचे सहकारी असलेले सावेडी येथील तलाठी सागर भापकर यांना निलंबित करण्यात आलेले आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी उपोषण करणाऱ्या व्यक्तींची भेट घेतल्यानंतर हे आदेश जारी करण्यात आलेले आहेत.निलंबित केलेल्या व्यक्तींची सखोल चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली होती. शिवप्रहार संघटनेचे युवक तालुकाप्रमुख गोरक्षनाथ शिवाजी लहारे , माणिक झिने , आदिनाथ झिने हे उपोषणामध्ये सहभागी झालेले होते.