नगरमध्ये एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून सैन्यात नोकरीला लावतो असे सांगत एका व्यक्तीची तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. भिंगार कॅम्प पोलिसात आरोपी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, भगवान काशिनाथ घुगे ( वय 29 जिल्हा नाशिक ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून सदर प्रकरणी आरोपी बापू छबु आव्हाड ( राहणार आंबेगाव जिल्हा नाशिक ) , सत्यजित भरत कांबळे ( राहणार श्रीगोंदा ), राहुल सुमंत गुरव ( राहणार चौसाळा जिल्हा बीड ) यांनी फिर्यादी व्यक्तींना आपण आर्मीत काम करत असल्याचे सांगत जामखेड रोडवर एका ठिकाणी बोलावून घेतले होते.
काही कालावधीनंतर आरोपींनी फिर्यादींना आमची आर्मीतील एका मोठ्या अधिकाऱ्यासोबत ओळख आहे तुम्हाला आर्मीत नोकरीला लावतो असे सांगत वेळोवेळी फोनपे आणि आरटीजीएसच्या माध्यमातून सुमारे चार लाख 90 हजार रुपये घेतले मात्र कुठल्याही स्वरूपाची नोकरी फिर्यादी यांना मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर फिर्यादींनी पोलिसात धाव घेतली आहे.