छत्रपतींचा पुतळा कोसळला प्रकरणात आरएसएस कनेक्शन आलं समोर

शेअर करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यानंतर राज्यात महायुती सरकारच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जाहीर माफी मागत ‘ एकदाच नव्हे तर शिवरायांच्या पायाशी 100 वेळा माफी मागण्यास तयार आहे ते आमचे दैवत आहेत ‘ असे म्हटलेले आहे. 

पंतप्रधान मोदी यांची सरबराई करण्याच्या उद्देशाने शासकीय नियमावली आणि निकषांचे पालन न करत उभारण्यात आलेला होता. अचानकपणे महाराजांचा पुतळा कोसळला आणि महाराजांच्या पुतळ्याच्या कामाच्या प्रती किती निष्काळजीपणा दाखवण्यात आला हे देखील समोर आले. 

एकनाथ शिंदे म्हणाले की , ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार पुतळा त्याच ठिकाणी उभारण्यासाठी विरोधकांनी काही सूचना सांगाव्यात . झालेली घटना दुर्दैवी आहे . नौदलाने चांगल्या भावनेने तो पुतळा उभारला होता पण घटनेचे राजकारण करण्याची इच्छा दुर्दैवी आहे. शिवाजी महाराजांच्या पायावर मी एक वेळा नाही तर हजार वेळा नतमस्तक व्हायला तयार आहे यावर राजकारण करू नये ,’ असे देखील आवाहन त्यांनी केलेला आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ,’ शिल्पकार जयदीप आपटे हा आरएसएसचा माणूस असून संघाच्या माणसाला पुतळ्याच्या निर्मितीचे काम देण्याचे काय कारण होते ?,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही राजकारण करतो असा आरोप करतात आता पुतळ्यातील कमिशन खोरीला कोणते राजकारण म्हणायचे ? ‘ असे देखील खडा सवाल यांनी उपस्थित केलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मूक आंदोलन करण्यात आलेले होते त्यावर देखील विरोधकांनी इतकेच असेल तर आंदोलन करण्याऐवजी सरकारमधून बाहेर पडा असा सल्ला दिलेला आहे. 


शेअर करा